Share

पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर

Published On: 

पुणे : पुणे शहरात आज नव्याने २४७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९५ हजार २१५ इतकी झाली आहे. शहरातील २४९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८४ हजार ०१६ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ६०१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३१ लाख १८ हजार ६६९ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार २८२ रुग्णांपैकी २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ९१७ इतकी झाली आहे.

दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील जनतेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी सणांमध्ये काळजी न घेतल्यास पुन्हा निर्बंध लावू असा इशारा त्यांनी दिला आहे. पवार म्हणाले, केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तिथे लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. एक सण मोठ्या प्रमाणात साजरा केला.

त्यामुळे आता तिथे प्रचंड कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याने पुन्हा निर्बंध लावावे लागले आहेत. महाराष्ट्रात गोपाळकाला, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण ओळीने येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा मग निर्बंध लावावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!