Share

‘आमच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता, पण या सरकारने…’

Published On: 

पुणे : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. आता विधानसेभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडा शर्यतीवरुन राज्य सरकारवर आरोप केला आहे.

आमच्या सरकारच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. पण ती मागे घेण्यासाठी या सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. कोणतीच पाऊले उचलली नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

बैलगाडा मालकांनी भेट घेतली आहे. आम्ही केंद्रीय मंत्र्यांनाही भेटू, सर्वेच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उचललून धरण्यासंदर्भात आम्ही निश्चित प्रयत्न करु, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्य सरकारने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारला बैलगाडा शर्यतीवरुन सुनावलं आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्याची मागणी करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी लातुक्यातील झरे येथे भव्य बैलगाडा छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. त्याची जंगी तयारी देखील सुरु आहे. मात्र आजपासूनच पोलीस नाकाबंदी लावणार असल्याने भाजप आक्रमक झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!