उस्मानाबाद: संपूर्ण राज्यभराला महावितरणचा कारभार माहितीच आहे, त्यामुळे त्याचे वर्णन न केलेलेच बरे, लोकांना त्रास देण्यासाठी महावितरण नवीन नवीन प्रकार शोधात असती कि काय असा प्रश्न सध्या पडत आहे, गेल्या दोन महिन्यांपासून शहरात अन परिसरात कोरोना पार्श्वभूमी संचारबंदी व शनिवार-रविवार जनता कर्फ्यू असल्याने नागरिक घरातच आहेत. कोरोनाचा एकीकडे प्रादुर्भाव आणि दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभाराने ग्राहक हैराण झाले आहेत. बुधवारी मुख्य विद्युतवाहिनी तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
महावितरणकडून दुरूस्तीच्या नावाखाली दररोज तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित केला जात असून, नवीन सबस्टेशनचे काम गेल्या रखडले आहे. सबस्टेशनचे वर्षापासून सुरू असलेले हे काम कार्यान्वित व्हायला उशीर होत असल्याने जुन्या वाहिनीवर अतिरिक्त भार पडत असल्याने सातत्याने विद्युत पुरवठा हा खंडित होत असतानाच बुधवारी सकाळी साडेसात वाजता डिग्गी रोडवरील दिग्विजय गॅस एजन्सीसमोर दोन ठिकाणावरून एकत्र आलेल्या मुख्य विद्युत वाहिन्यांपैकी ग्रामीण व शहरातील डिग्गी रोड भागात वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये घर्षण झाल्याने मुख्य वाहिनी तुटून एका हॉटेलसमोर असलेल्या छतावर पडली.
कोरोना पार्श्वभूमीवर हे हॉटेल बंद असल्याने हॉटेलात ग्राहक नसल्याने जीवितहानी झाली नसलीतरी परिसरात घरे असल्यामुळे वाहिनीवर पाय पडून धोका होण्याची शक्यता होती. परिसरातील नागरिकांनी मुख्य तार तुटून पडल्याची माहिती देवून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करून मुख्य विद्युत वाहिनी तुटून पडल्याची माहिती देण्यासाठी मोबाइलवरून संपर्क साधला असता दोन्ही क्रमांक नॉटरिचेबल आले. त्यांनंतर एका कर्मचाऱ्यास माहिती देवून विद्युत पुरवठा बंद करून घेण्यास सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ मात्र,अर्थचक्राला झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री
- ज्यादा भाडे दर आकारणार्या रुग्णवाहिकांवर परभणी आरटीओ कारवाई करणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- बीड येथे वाळू माफियांवर कारवाई; ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

