उस्मानाबाद: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट बघायला मिळत आहे मात्र मृत्यूदर कायम असल्याने अजूनही चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी दिवसभरात ४०० नवे रूग्ण आढळून आले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९७ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी मृत्यूदर कायम असल्याचे चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील ३८७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते तर १९६२ जणांची रॅपिड ॲन्टीनज टेस्ट करण्यात आली होती. यापैकी ४०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातील १०२, तुळजापूर ८०, उमरगा ३०, लोहारा ३५, कळंब २८, वाशी ५७, भूम २५ तर परंडा तालुक्यातील ४३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे दिवसभरात ११जणांचा मृत्यू झाला आहे. यात उस्मानाबाद, बसवंतवाडी, तुळजापूर, उमरेगाव, बामणी, थुक्रटवाडी येथील रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६० टक्के तर मृत्यूदर २.२८ टक्के आहे. आतापर्यंत २ लाख ६५ हजार २६७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ४९९०३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचे शेकडा प्रमाण ३८.६० टक्के आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत ५१५१ रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू असून ११३२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर एकूण ४९९०३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ४३६२० जणांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सक्षम त्यामुळे मोदी फक्त गुजरातच्या दौऱ्यावर :संजय राऊत
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
- ‘आवळा देऊन कोहळा काढण्याचा केंद्राचा प्रयत्न’, खा.प्रतापराव जाधव यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
