मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दिवला भेट देऊन तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. भावनगर, उना, दिव,जाफराबाद आणि महूआ या भागाची हवाई पाहणी देखील पंतप्रधान करणार असून अहमदाबाद इथं आढावा बैठक घेणार आहेत.
दरम्यान तौक्तेमध्ये गुजरातमधील २७ जणांनी जीव गमावल्याचे वृत्त आहे. गुजरातमधील किनारी भागात या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून, इथले वीजेचे खांब, मोठाले वृक्ष आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय इथल्या रस्त्यांचेही नुकसान झाल्यी माहिती समोर येत आहे.
तौक्ते चक्रीवादळामुऴे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. घराचं नुकसान झालं आहे. दरम्यान, आता मोदींच्या दौऱ्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावे. असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले आहे. गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील, असे संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
- ‘ही वेळ मोर्चे काढण्याची नाही, आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो’
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत


