परभणी: एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरी कडे गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बोरगाव येथील बांधकाम सुरु असलेल्या पुलाखाली एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असल्याने येथील परिसरात एकंच खळबळ उडाली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मयताची ओळख पटली असून तो परभणी येथील लहूजीनगरातील रहिवासी आहे. मयताचे नाव विजय खपले असे आहे.
बोरगाव शिवारात बांधण्यात येत असलेल्या पुलाखाली मंगळवारी सकाळी एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेव्हा परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मयत युवकाची ओळख पटवली असता तो शहरातील लहुजीनगर येथील रहिवासी असून त्याचे नाव विजय खपले असल्याचे समोर आले. सदर युवक परभणी शहरातील शिवाजीनगरातील एका खाजगी दवाखान्यात काम करत होता. मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर एकच हंबरडा फोडला.
विजय खपले ज्या खाजगी रूग्णालयात काम करत होता त्या रूग्णातील डॉक्टरने मध्यरात्री मयताच्या घरी जाऊन जिवे मारण्याचा धमक्या दिल्या होत्या. तसेच ‘हातपाय तोडून टाकतो, तुझा जीव घेतो’, अशा धमक्या दिल्या होत्या. सतत फोन करून सदर डॉक्टर जिवे मारण्याच्या धमक्या देत होते. त्या संदर्भातील मोबाईलवर बोललेल्या, धमक्या दिलेल्या ऑडिओ क्लिप सुद्धा वायरल झाल्या आहेत. त्यामुळे नातेवाईकांचा स्पष्ट आरोप आहे की, सदर डॉक्टरनेच विजय खपले याचा घातपात केला आहे. त्याकरिता त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
- ‘आवळा देऊन कोहळा काढण्याचा केंद्राचा प्रयत्न’, खा.प्रतापराव जाधव यांचा आरोप
- मोदींसमोर गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, मात्र गडकरीच पंतप्रधान पाहिजेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
- संजय राऊत म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मधला तिवारी ; संदीप देशपांडे यांचा घणाघात
- लातुरात रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्युदर काही कमी होईना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
