Share

बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारत आणि न्युझीलंड हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे आहेत. इंग्लंडमधील साउथहॅम्पटन येथे १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना होणार आहे. तसेच यावेळी भारतीय संघासोबत भारतीय महिला क्रिकेट संघही इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघ हे एकाच विमानाने इंग्लंडला रवाना होतील.

यादरम्यान बीसीसीआयने पुरुष आणि महिला संघात प्रवासाच्या व्यवस्थेत आणि कोरोना चाचणीच्या व्यवस्थेत भेदभाव करत आहे अशी महिती समोर आली होती. यावर महिला संघाकडुन प्रतिक्रिया देण्यासाठी महिला टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पुढे आली आहे. हरमनप्रीतने ट्विट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कोरोना चाचणी वैयक्तिक पातळीवर करण्याचा निर्णय हा सर्वस्वी खेळाडूंनी स्वत: घेतला आहे. असे तिने म्हणले आहे. मीताली राजनेही असेच ट्विट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

भारताचा पुरुष क्रिकेट संघ प्रथम न्युझीलंड सोबत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना आणि यानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. तर महिला क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघासोबत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. २ जून रोजी हे दोन्ही संघ एकाच चार्टर्ड विमानाने इंग्लंडला रवाना होतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!