🕒 1 min read
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. बाधित रुग्ण व मृत्युदर रोखण्यास प्रशासन प्रयत्न करीत आहे. पण आरोग्य यंत्रणा तोकडी असल्याने प्रयत्न अपुरे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवारी (दि. २०) देशातील दहा राज्यांतील ५४ जिल्ह्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज ५० जिल्हाधिकाऱ्यांचे संवाद साधत आहेत. मंगळवारी इतर राज्यातील पन्नास जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आहे. तर आता गुरुवारी ५४ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण सदस्य संख्या कोरोनामुक्त रुग्ण मृत्युदर उपलब्ध आरोग्य यंत्रणा प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपायोजना व तिसरी लाट रोखण्यासाठी केली गेलेली तयारी यावर ते जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषद, महापालिका, आरोग्य यंत्रणा यासह सर्वच विभागाकडून माहिती संकलित केली जात आहे.
राज्य शासनाने तिसरी लाट येण्याचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काय तयारी आहे? याचाही आढावा पंतप्रधान मोदी घेणार आहेत. उपचार करण्यासाठी प्रशासनासमोर कोणत्या अडचणी आहेत, याचाही लेखाजोखा पंतप्रधान घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींसमोर गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, मात्र गडकरीच पंतप्रधान पाहिजेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
- ‘ही वेळ मोर्चे काढण्याची नाही, आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो’
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
