🕒 1 min read
उस्मानाबाद: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी दि. १८ जून रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून माजी आमदार राहुल मोटे यांनाही पवार भेटणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर अन्य दोन मंत्री देखील असणार आहेत. त्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सोबत असल्याचे दिसत आहे. तसेच व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांचा अधिकृत शासकीय दौरा आला असून अन्य दोन मंत्र्याचा अजून दौरा आलेला नसला तरी ते पवार यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शुक्रवारी तीन महत्वाच्या मंत्र्यांचे आगमन होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार राहुल मोटे यांच्या साठी हा दौरा अतिशय महत्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासुन पवार यांचा उस्मानाबादचा हा पहिलाच शासकीय दौरा आहे.
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उस्मानाबादचा हा अजित पवारांचा पहिलाच दौरा असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. शासकीय विमानाने मुंबईहून सकाळी आठच्या दरम्यान औरंगाबाद येथे पवार यांचे आगमन झाले. औरंगाबाद येथून मोटारीने बीड मार्गे पावणे एक वाजता गिरवली (ता.भूम) येथे त्यांचे आगमन होणार आहे. नंतर एक तासाचा वेळ त्यानी माजी आमदार राहूल मोटे यांच्याकडे राखीव ठेवला आहे. गिरवली येथून दुपारी पावणे तीन वाजता उस्मानाबाद येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आणि जिल्हा खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत. दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद असणार असून त्यानंतर सव्वा पाच वाजता पवार मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करणार असल्याचे शासकीय दौऱ्यात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तरी न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊ नका’ ; दिग्गज फलंदाजाचा भारतीय संघाला सल्ला
- अजित पवार उस्मानाबाद दौऱ्यावर; माजी आमदार मोटेंची घेणार भेट
- अंतिम सामन्यात खेळण्याचं सिराजचं स्वप्न अधुरं
- ‘कोहलीचा संघ सर्वोत्तम खेळ करेल’ ; भारतीय संघ अंतिम सामना जिंकणार गांगुलींचा विश्वास
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
