🕒 1 min read
इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला काही तसाच उरले आहेत. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. भारतीय संघाने या महामुकाबल्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा केली आहे.
अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे. संघात इशांत शर्मा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळली. तसेच सामन्यापूर्वी विराटने जिंकण्याचा विश्वास दाखवला आहे.
मागील दोन वर्षांपासून सुरु असलेली WTC ही क्रिकेट जगतातील एक मोठी स्पर्धा असल्याने जगभरातील दिग्गज आणि क्रिकेट तज्ज्ञ आपली मत नोंदवत आहेत. भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने देखील भारताला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटलं असलं तरी न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही असंही म्हटलं आहे.
लक्ष्मणने प्रसिद्ध वहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. लक्ष्मण म्हंटले, ‘भारताचा संघ अनेक अडचणींचा सामना करुन मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोहचलाय. त्यामुळे प्रत्येक बॉल जिंकण्याच्या हेतून खेळणं गरजेच आहे, दोन्ही संघाकडे उत्कृष्ट खेळाडू असल्यानं सामना चुरशीचा होईल असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
