Share

अजित पवार उस्मानाबाद दौऱ्यावर; माजी आमदार मोटेंची घेणार भेट

Published On: 

उस्मानाबाद: उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी दि. १८ जून रोजी उस्मानाबाद येथे माजी आमदार राहुल मोटे यांच्या गिरवली या गावी भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांचे लाडके सहकारी अशी ओळख असणारे माजी आमदार मोटे यांच्या राजकारणाला या भेटी नंतर वेगळे वळण मिळणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अनेक वर्षे माजी आमदार कै. महारुद्र मोटे व माजी आमदार राहूल मोटे या पितापुत्रांनी माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील, माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राजकारण केले. मात्र आमदार पाटील यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीपुर्वी आमदार पाटील यांनी जारी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी देखील मोटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. तानाजीराव सावंत यांनी मोटे यांचा पराभव केला. मोटे यांच्या पाठीशी डॉ. पाटील यांचे तगडे पाठबळ राहिले नाही. कोरोनाकाळात जास्त सक्रिय दिसून आले नाहीत. शुक्रवारी दि. १८ जून रोजी उपमुख्यमंत्री पवार यांची होणार भेट माजी आमदार मोटे यांना बळ देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार मोटे यांची ओळख उपमुख्यमंत्री पवार यांचे लाडके सहकारी अशी आहे. अजित पवार मोटे यांना कायम उजवा कौल देतात असा अनुभव यापूर्वी अनेक वेळा मतदारसंघात बघायला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री पवार आणि माजी आमदार मोटे यांची भेट नक्कीच उस्मानाबादच्या राजकारण नक्कीच काही तरी नवे वळण आणणार, अशी चर्चा जिर धरत आहे. मात्र नक्की काय होणार हे येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!