कोल्हापूर : दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा हाहाकार दिसून येत आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका वाढला आहे. आलेल्या पुरामुळे सांगली – कोल्हापूर बायपास महामार्गासह 9 मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवास कोणीही करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यातच आता कोल्हापुरात आता सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोलचा पुरवठा केला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनांनाच केवळ इंधनाचा पुरवठा होणार आहे. पूरस्थितीमुळे अशा प्रकारचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. पूरस्थिती गंभीर होत असताना, लोक अनावश्यक बाहेर फिरत असल्याने जिल्हा प्रशासने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्र व कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत चालली आहे.त्यामुळे आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीतील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दुधगंगा या नद्यांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पहाटे चार वाजता पाण्याखाली गेला आहे. याबरोबरच तालुक्यातील इतर सांगली-कोल्हापूर बायपास मार्गासह जिल्हा आणि राज्य आठ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तळई दुर्घटना; पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत जाहीर
- औरंगाबादेत ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी १० कोटी ८० लाखांचे पॅकेज, मुलभूत समस्या आतातरी सुटणार का?
- मंत्र्यांच्या हातातील कागद हिसकावून फाडले, खासदार शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित
- ‘पूर परिस्थितीतही मुख्यमंत्री मातोश्रीवर आहेत, आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो’
- आयटीआयसाठी ४१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

