Share

आयटीआयसाठी ४१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी!

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्थात आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विकल्प नोंदणीही केली जात आहे. त्यातील ९६६ आयटीआयमध्ये ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. यामध्ये आठवडाभरात ४१ हजार विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

करूनच या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रामध्ये परिवार परिणाम झाला असून शैक्षणिक चित्राचे यात मोठे नुकसान झाले आहे शाळा महाविद्यालय बंद ठेवावी लागली होती मात्र कोरूना नियमांचे पालन करीत चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सध्या राबवली जात आहे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्यात शासकीय आणि खाजगी ९६६ आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आयटीआय मध्ये एक लाख ३६ हजार जागा असून विकल्प भरण्यास सुरुवात झालेली आहे.

आठवडाभरात ४१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्यातील स्थानिक ९० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे तर जिल्ह्यातील दहा टक्के विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव आहेत. औरंगाबादच्या शासकीय आयटीआय मध्ये २९ व्यवसायाच्या ५३ तुकड्यांमध्ये ११७२ जागा भरल्या जाणार असून विकल्प भरण्याची सुरुवात झाली आहे.

प्रवेश प्रक्रिया राबवली जात असताना विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्राचार्य अभिजित अल्टे यांनी प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन समिती स्थापन केली आहे. प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख रवी पत्की हे असून समजले शिक्षण समितीची प्रशिक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. आयटीआयमध्ये प्रवेश यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून आज पासून विकल्प भरण्यास सुरुवात झाली आहे. यांत्रिकी डिझेल, लघुलेखन मराठी, कम्प्युटर ऑपरेटर, यंत्रकारागीर घर्षक, आरेखक स्थापत्य, आरेखक यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी व्यवसायाला प्राधान्य देताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!