Share

औरंगाबादेत ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी १० कोटी ८० लाखांचे पॅकेज, मुलभूत समस्या आतातरी सुटणार का?

Published On: 

औरंगाबाद : शहरातील अनेक भागांमध्ये लिक झालेले ड्रेनेज त्यामुळे रस्त्यांवर वाहणारे ड्रेनेजचे पाट अशी परिस्थिती आहे. यामुळे अनेक ठिकाणी रोगराई पसरलेली आहे. मात्र मनपाचे आत्तापर्यंत याकडे दुर्लक्ष झाले होते. आता देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मनपा प्रशासनाने प्रत्येक झोन कार्यालयासाठी १ कोटी २० लाखांचे पॅकेज जाहीर केले आहे. नऊ झोनकरिता दहा कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ड्रेनेज आणि पाणीपुरवठा संबंधीची दुरुस्तीची कामे या निधीतून केली जाणार आहेत. त्यामुळे येणारा काळात शहरातील वॉर्डावॉर्डांमध्ये ड्रेनेज संबंधी कुठलीही समस्या दिसायला नको. मात्र मिळालेल्या निधीचा वापर कसा होतो यावर ते अवलंबून आहे.

महानगरपालिकेची कर वसुली मोठ्या प्रमाणावर थंडावली आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव हे कारण यासाठी दिले जात आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यामुळे मार्च महिन्यात होणारी सर्वाधिक वसुली होऊ शकली नाही. कोरोनाची पहिली लाट सुमारे चार ते पाच महिने होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला. फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यात देखील बहुतांश व्यवहार बंद होते. त्यामुळे कर वसुली होऊ शकली नाही.

कर वसुली न झाल्यामुळे मनपाचे मोठे उत्पन्न बुडाले. त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत आहे. रस्त्याची कामे वगळता अन्य कोणतीही विकासकामे करायची नाही असा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. केवळ देखभाल दुरुस्तीची कामे करण्याचे पालिकेने ठरवले आहे. पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाची देखभाल दुरुस्तीची कामे असतात ही कामे तात्काळ करावी लागतात.

त्यामुळे या कामांसाठी झोन कार्यालय निहाय पॅकेज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ६० लाख आणि ड्रेनेज विभागाचा देखभाल दुरुस्तीसाठी साठ लाख असे १ कोटी २० लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. महापालिकेची ९ झोन कार्यालय आहेत. ९ झोन कार्यालयांसाठी दहा कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!