औरंगाबाद : बीएसएनएलच्या सीमकार्डची मुदत संपल्याची बतावणी करुन बँक खात्याची माहिती मिळवून भामट्याने सेवानिवृत्त वृध्दाच्या खात्यातील तीन लाख ६० हजारांची रोकड तीन टप्प्यात लांबवली. हा प्रकार ८ एप्रिल रोजी अवघ्या वीस मिनिटात घडला. कुलदीपसिंग असे या भामट्याचे नाव आहे.
बीएसएनएल कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करत कुलदीपसिंग या भामट्याने सय्यद काजीम अली हाश्मी (६९, रा. सदफ कॉलनी) यांना दुपारी तीन वाजून ५५ मिनिटांनी फोन केला. तसेच सय्यद काजीम यांच्या मोबाईलवर त्याने मॅसेज पाठवत तुमचे बीएसएनएलचे कार्ड येत्या बारा तासात बंद होणार असल्याचे सांगितले. त्यासाठी तुम्ही बीएसएनएल क्यूब हे अ;ॅप डाऊनलोड करा असा सल्लाही दिला. याचवेळी कुलदीपसिंगने अ;ॅप डाऊनलोड केल्यावर व्हिवर्स आॅप्शन आल्यावर त्यावर माहिती मिळेल असे सांगितले.
त्यानुसार, सय्यद काजीम यांनी प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर कुलदीपसिंगने त्यांना कार्ड सुरू करण्यासाठी अकरा रुपये लागतील असे सांगत ही रक्कम एटीएमव्दारे भरावी लागेल. त्यासाठी तुम्ही एटीएम कार्डची संपुर्ण माहिती पाठवा तसेच बँकेच्या पासबुकचा फोटो लवकरात लवकर पाठवण्याची बतावणी केली.
त्यानुसार, सय्यद काजीम यांनी अ;ॅप्लीकेशनवरुन माहिती पाठवली. त्यानंतर अवघ्या वीस मिनिटात सय्यद काजीम यांच्या बँक खात्यातून तीन टप्प्यात तीन लाख ६० हजारांची रक्कम कुलदीपसिंगच्या खघत्यात वळती झाली. हा प्रकार समोर आल्यावर रविवारी दुपारी सय्यद काजीम यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठत फसवणुकीची तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास आर. के. मयेकर करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुला कोण ऐकतं’ असं म्हणणाऱ्या ट्रोलर्सला महेश काळेचे सणसणीत उत्तर
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- भाजपच्या माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन, नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाही विचारात घेतले नव्हते – नवाब मलिक
- मोठी बातमी : दहावी बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे


