Share

जिंतूरात व्यापाऱ्याची पोलिसांवर दादागिरी करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

Published On: 

परभणी: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लावण्यात आली आहे. शहरात संचारबंदीच्या काळात किराणा दुकान चालू असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर बंद करण्याची विनंती करताच संतप्त दुकानदाराने मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान पोलीसांच्या हातातील काठी हिसकावून मारण्याचा प्रयत्न करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुला समोर घडली.

कोरोनाच्या महामारीत आपले कर्तव्य बजावत असताना व्यापाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या प्रकारामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातही बलसा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ऋषिकेश प्रॉव्हिजनचे मालक प्रल्हाद टाकरस हे संचारबंदीच्या काळात आपले दुकान उघडून बिनधास्त व्यापार करत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या निदर्शनास आले.

यावेळी पोलिसांनी संचारबंदीच्या काळात दुकान चालू ठेवु नये बंद करावे अशी विनंती केली. मात्र संतप्त झालेल्या टाकरस यांनी पोलिसांसोबत हुज्जद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी संतप्त झालेल्या दुकानदारास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदाराने पोलीस अधिकाऱ्यास एकेरी भाषेत बोलण्यास सुरुवात करून पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांचा हातातील काठी हिसकावून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर पोलिसांनी त्यास पकडून लाठीचा चांगलाच चोप दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!