हिंगोली: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बाहेरगावाहून तसेच बाहेर राज्यातून गावात येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत.जिल्ह्यात सद्य:स्थितीत १,५५० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही चांगलीच वाढत आहे.
त्यासाठी बाहेरगावावरून तसेच बाहेर राज्यातून ग्रामीण भागात येणाऱ्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जयवंशी यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या शाळा अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. या शिवाय गावपातळीवरील पथकाने बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवावे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षातच ठेवावे.
ज्या नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनाही विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शाळांमधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जि.प.च्या ८७० प्राथमिक शाळा असून २९ माध्यमिक शाळा आहेत. पुढील काही दिवसांतच या शाळा अधिग्रहित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला आयसीसीने केले निलंबीत
- ‘स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगा मोदी सरकारला आयुष्यभर छळतील’
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- ‘एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे एक निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!’
- ‘या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

