🕒 1 min read
नवी दिल्ली- केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा हा ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द केला होता. यानंतर प्रथमच जम्मू-काश्मीरच्या प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तब्बल ३.३० तासाची चर्चा करण्यात आली. जम्मू-काश्मीरशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असल्याचे नेत्यांनी सांगितले.
सर्वपक्षीय बैठकीत माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.बैठकीत उमर अब्दुल्ला, रविंद्र रैना, कवींद्र गुप्ता, निर्मल सिंह, सज्जाद लोन, भीम सिंह या नेत्यांची उपस्थिती होते. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एनएसए अजित डोवाल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
PM @narendramodi is Chairing an All-Party meeting with various political leaders from Jammu and Kashmir. pic.twitter.com/nIUaV6qwF0
— PMO India (@PMOIndia) June 24, 2021
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सर्वांकडून सूचना जाणून घेतल्या आहेत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे त्यांचे मते व्यक्त केल्याने पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. काश्मीरचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी ही खुली चर्चा होती.या चर्चे दरम्यान, उपस्थित नेत्यांनी राज्याचा दर्जा, विधानसभा निवडणुकीसह लोकशाहीचे पुनरुज्जीवन, काश्मीर पंडितांचे पुनर्वसन आणि सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता आणि स्थानिक रहिवाशी नियम याबाबतचे विविध मुद्दे उपस्थित केले.
जम्मू-काश्मीरच्या सर्वांगिन विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. राज्याच्या भवितव्याबाबत बैठकीत चर्चा झाली. राज्यात लवकरच शांततेत निवडणूक घेण्यात येईल. तसंच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन संसदेत सरकारने दिलं होतं. यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सरकारने ही बैठक घेवून दाखवून दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी जम्मू काश्मीरमधील नेत्यांना विश्वास दिला. जम्मू काश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सर्व एकत्र काम करणार आहोत. जम्मू काश्मीरमधील जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकार पावलं उचलत आहे, असं भाजपा नेते रविंद्र जैन यांनी सांगितलं. दरम्यान, या चर्चेनंतर आता केंद्र सरकार नेमके काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…आम्ही एकत्र पुढे जाऊ’ ; पराभवानंतर कोहलीचे भावनात्मक ट्विट
- भाजपचे सर्व नेते धुतल्या तांदळाचे, EDची पिडा फक्त विरोधकांच्या मागेच का ?
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
