Share

भुसावळमध्ये पहिल्यांदाच तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

भुसावळ : मुल होत नाही म्हणून सासरच्या लोक सतत छळ करत होते. त्यातच एके दिवशी पतीने तीन वेळा तोंडी तलाक दिला. यामुळे विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पतीसह सासरकडील ७ जणांविरुद्ध विनयभंग, हुंडा प्रतिबंधक कलम आणि मुस्लीम महिला विवाहाच्या अधिकारचे संरक्षण कायदा २०१९ चे कलम ४ नुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भुसावळ शहरात दाखल झालेला या प्रकारचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनूसार, आझाद नगर येथील विवाहितेचा सासरकडील मंडळींनी १० मार्च २०१९ ते १० एप्रिल २०२१ या काळात शारीरिक व मानसिक छळ केला. तुला येथे सुखाने नांदायचे असेल तर सर्व सहन करावे लागेल, असे घरातील ज्येष्ठांनी वारंवार सांगितले. फिर्यादी महिला व तिच्या पतीला वेगवेगळ्या खोलीत ठेवून आपसात बोलूही देत नव्हते.

१० एप्रिलला विवाहितेच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. यावेळी पतीने सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून सर्वांसमोर पत्नीला ‘अाम्ही तुला मुस्लीम धर्म रीतिरिवाजाप्रमाणे तलाक दिला आहे’ असे सांगितले. तसेच कोऱ्या स्टॅम्पवर विवाहितेच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. महिलेच्या भाच्याने विवाहितेचे फोटो समाजात दाखवून बदनामी करेल. तुझ्या भावांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!