Share

औरंगाबादेत ऑनलाईन तलवारी खरेदी करणाऱ्या एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ४९ तलवारी जप्त

Published On: 

औरंगाबाद : ब्ल्यू डार्ट कोरीअरच्या पार्सलमध्ये सापडलेल्या पाच तलवारी पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी जप्त केल्या होत्या. त्या आधारे जिन्सी पोलिसांसह पुंडलिकनगर पोलिसांनी बायजीपुरा भागात एकाच्या घरावर धाड टाकत ४९ तलवारी जप्त केल्या. इरफान खान उर्फ दानिश खान अय्युब खान वय २० रा. हमजा मशिदजवळ जुना बायजीपुरा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुंडलिकनगर पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती कि, ब्ल्यू डार्ट कोरीअर मधून शहरात पाच तलवारींची ऑर्डर येत आहे. त्या आधारे पोलिसांनी एका टाटा गाडीची झडती घेत पाच तलवारी जप्त केल्या होत्या. त्यावेळी या तलवारी इरफान उर्फ दानिश याने मागविल्याचे निष्पन्न झाले होते. हि माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी उपायुक्त गिऱ्हे यांना दिली. त्यानंतर पुंडलिकनगर आणि जिन्सी पोलिसांचे संयुक्त पथक तयार करून इरफान उर्फ दानिशच्या घरावर छापा टाकण्यात आला.

त्यावेळी इरफान उर्फ दानिश पोलिसांना घरीच मिळून आला. त्याच्या घराची झडती घेत असताना पोलिसांना ऑनलाईन मागविलेल्या ३६ तलवारी, ६ कुकरी, २ गुप्ती असा शस्त्रसाठा सापडला. यावरून पोलिसांनी दानिशला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून ६ दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे. तसेच इरफान उर्फ दानिश याच्याकडून कोणी ऑनलाईन अथवा थेट तलवारी घेतल्या असतील तर त्या जिन्सी पोलिस ठाण्यात जमा करण्याचे पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी सांगितले.

हि कारवाई पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे, सपोनि घनशाम सोनवणे, उपनिरीक्षक विशेष शाखा दत्ता शेळके, उपनिरीक्षक सरोवर शेख, गोकुळ ठाकूर, सफौ अय्युब पठाण, संपत राठोड, हरून शेख, भाऊसाहेब जगताप, गणी शेख, बाळू थोरात, सुनील जाधव, बाळाराम चौरे, रमेश सांगळे, अजय कांबळे, जालिंधर मांटे, प्रवीण गुळे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!