बीड : कोरोनामुळे मराठवाड्यात लॉकडाऊन करण्यास सुरुवात झाली आहे. नांदेडनंतर आता बीड जिल्ह्यातही १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात कलम १४४ अनुसार लॉकडाऊनचे आदेश लागू करण्यात येत आहेत. २६ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. बीड नगरपालिका शहर, ग्रामीण भागातही हा आदेश लागू राहणार असल्याचं या पत्रात म्हटले आहे.

बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात सर्वकाही बंद राहणार आहे. तसेच, जिल्ह्यातील वाहतूक सेवाही बंद राहणार असून पूर्व परवानगीनेच अत्यावश्यक सेवांसाठी ही वाहतूक सुरू राहिल, असे या आदेशात म्हटले आहे. किराणा दुकानांच्या ठोक विक्रेत्यांना सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यावेळीही, सामाजिक अंतर आणि मास्क बंधनकारक असणार आहे. दूधविक्री सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहिल. भाजीपाला आणि फळांची विक्रीही सकाळी ७ ते १० या वेळतच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो
- ‘संघ निवडताना भेदभाव’ ; कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग
- ‘वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमवले; ईडी, इन्कम टॅक्सने याचा तपास केला पाहिजे’
- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट
- ‘भाई जगताप टपोरी आहेत.. त्यांना ‘भाई’ बनायचं होतं,पण…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

