Share

पाटलांच्या हाती गोकुळचे सूत्रे येताच ‘ऍक्शन मोड’मध्ये; कोरोनाला हरवण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : ४ मार्च रोजी गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तब्बल ३० वर्षांनी गोकुळ मध्ये सत्तापालट झाला असून सतेज पाटील-मुश्रीफ गटाने महादेवराव महाडिक यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. एकाबाजूला निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकारण तापलं असतानाच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रोगाने हाहाकार माजवला आहे.

त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन व जनता कर्फ्यू सारखे कठोर निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान, गुरुवारी कर्नाटकच्या बेल्लारीमधून केंद्र सरकारद्वारे येणारा ऑक्सिजन कर्नाटक सरकारने रोखल्यामुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असताना आता पालकमंत्री सतेज पाटील आणि गोकुळने ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे.

गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लान्ट उभारणार आहे, अशी मोठी घोषणा गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या ऑक्सिजन मागणीच्या पूर्ततेसाठी मोठी मदत होणार आहे. सत्ता येताच पाटलांनी केलेली ही दुसरी मोठी घोषणा ठरली आहे. तर, निकाल लागलेल्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना पाटलांनी शेतकऱ्यांना दुधाला लिटरमागे 2 रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली होती. ‘दोन रुपये दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. दोन महिन्यांच्या अवधीत दिलेली आश्वासने पूर्ण करणार,’ असं देखील सतेज पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!