औरंगाबाद : जिल्हयातील ८१२ गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण नाहीत. ही दिलासा देणारी बाब आहे. त्रिसूत्रीचे पालन केल्याने त्या गावांमध्ये रुग्ण नसल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी सांगितले.
राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शहरातसह आता ग्रामीण भागातही रुग्ण संख्येत वाढ होते आहे. मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. मध्यंतरी कमी झालेल्या रुग्णसंख्ये नंतर बेजबाबदारपणे निर्बंधांचे उल्लंघन लोकांनी केल्याने ही रुग्ण संख्या वाढली. मागील वर्षी कोरोनामुळे शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरला होता. परंतु यंदा शहरासह ग्रामीण भागातही सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून येत आहे. लक्षण नसलेल्या रुग्णांचा वावरामुळे देखील प्रदुर्भावात वाढ झाली. यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी ग्रामदक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.
सध्या ६०४ गावांमध्ये कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर ८१२ गाव असे आहेत तिथे आठवडी बाजार नाहीत, कमी लोकसंख्या आहे. शिवाय गर्दी नाही, मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे यासारख्या गोष्टी पाळल्यामुळे त्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत. स्थानिक स्तरावर उपाय करत आहेत. याची पाहणी देखील केली जात असल्याचे डॉ. गोंदावले यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण, राहुल गांधींची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

