🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यातील लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. राज्य सरकारनं लॉकडाऊन संपवला नाही तर १ जूनपासून औरंगाबादमध्ये सर्व दुकानं उघडू आणि लॉकडाऊनचा निषेध करू, अशी ठाम भूमिका एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे.
यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आक्षेप घेत इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. ‘इम्तियाज जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करत आहेत. ते जर दुकानं उघडायला आले तर शिवसैनिक उत्तर देतील. लॉकडाऊन उघडलं तर तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनान इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करावी’, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
यावेळी जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे फक्त टीव्हीवर येतात आणि ज्ञान देतात. त्यांना राज्याच्या हिताचा काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे, पण आम्ही १ जूननंतर दुकानं उघडणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दुकानदारांचे हप्ते आणि व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात यावं. नाहीतर आम्ही लॉकडाऊन असला तरी तो झुगारून दुकानं उघडू अशा थेट इशारा यावेळी इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा ‘दीदी ओ दीदी’ केले, आता लोक ‘दादा गप्प बस दादा’ म्हणणार आहेत!’
- ‘राज्यपाल धनखड निवृत्त झाले तर तुरुंगात पाठवू’, बॅनर्जींच्या वक्तव्याने बंगालचे राजकारण पेटले
- भीक मागून कमावलेले पावणे दोन लाख चोरीला, मुंडेंच्या परळीतील घटना
- ‘कितीही कारवाई करा, १ जूननंतर आम्ही दुकानं उघडणारच’, खा.जलील यांचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘गंगेत प्रेतांचा खच हा राम मंदिराइतकाच महत्त्वाचा मुद्दा’
- धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार! ३१ मे रोजी ‘जागर’ करण्याचे गोपीचंद पडळकरांचे आवाहन


