Share

भीक मागून कमावलेले पावणे दोन लाख चोरीला, मुंडेंच्या परळीतील घटना

Published On: 

बीड : श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिरामुळे परळी शहराची जागतिक पटलावर ओळख आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीचा कायापालट केला. आता मंत्री धनजंय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकारणामुळे परळीचे नाव नेहमी चर्चेत येत आहे. मात्र, परळी शहरात एक अजब प्रकार समोर आला आहे. जेणेकरून परळीची आणखीन एक नवीन ओळख तयार होऊ शकते.

वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याचे १ लाख ७२ हजारांची चोरी गेलेली रक्कम परळी पोलिसांनी अवघ्या काही तासात मिळवून दिली आहे. बाबुराव नाईकवाडे असे त्या भिक्षुकाचे नाव आहे. ते मागील अनेक वर्षांपासून वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत. पण, कोरोना मुळे मंदिर बंद असल्याने अनेक भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यात आयुष्यभर पै पै जमा केलेली नाईकवाडे यांची रक्कम चोरट्याने लंपास केली. त्यामुळे नाईकवाडे चिंताग्रस्त झाले. बाबुराव नाईकवाडे यांनी हवालदिल होऊन परळी पोलिसांकडे मदत मागितली.

पोलिसांनी तातडीने पावलं उचलत तपास केला. त्यानंतर नाईकवाडे यांची चोरीला गेलेली जवळपास पावणे दोन लाख रुपयांची रक्कम अवघ्या काही तासातच त्यांना मिळवून दिली. त्यामुळे पोलिसांच्या तपास कार्याचं कौतुक होत आहे.

एकीकडे कोरोनाचं संकट असल्यानं अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात या परिस्थितीत एका भिकाऱ्याकडे मात्र मोठी रक्कम मिळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, हा प्रकार बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. भिकाऱ्याकडे एवढी मोठी रक्कम असल्याने सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

भिकाऱ्याची घरी चोरी होणे हा प्रकार दुर्मिळच म्हणावा लागेल. कारण चोरटे नेहमी धनदांडग्यांवर लक्ष केंद्रित करतात. पण लॉकडाऊन आणि कोरोनामुळे चोरट्यांचेही बेहाल झालेले दिसत आहेत. त्यामुळेच चोरट्यांनी आपला मोर्चा भिकाऱ्यांकडे वळवल्याचे समोर येतेय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!