Share

‘राज्यपाल धनखड निवृत्त झाले तर तुरुंगात पाठवू’, बॅनर्जींच्या वक्तव्याने बंगालचे राजकारण पेटले

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड निवृत्त झाल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करू, असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केले आहे. धनखड यांच्याविरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन जास्तीत जास्त तक्रारी दाखल करा, जेणे करून त्यांना त्याच प्रेसिडेन्सी कारागृहात पाठवता येऊ शकेल, जेथे त्यांनी आपल्या नेत्यांना पाठवले, असे बॅनर्जी यांनी हुगळीतील आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.

दरम्यान, राज्यपाल धनखड यांनी या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. एक ज्येष्ठ नेते, एक खासदार आणि एक ज्येष्ठ वकिलाच्या अशा खुलेआम बोलण्यामुळे आपण स्तंभित झालोत. पण हा मुद्दा आता बंगालची जनता आणि माध्यमांवर सोडून दिला पाहिजे, असे राज्यपालांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

https://twitter.com/jdhankhar1/status/1396383168190509056

कल्याण बॅनर्जी म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक भाजप नेते तुरुंगात असतील. त्यामध्ये धनखड यांचाही समावेश असेल. त्यांच्याच आदेशानुसार नारद स्टिंग प्रकरणात टीएमसीच्या नेत्यांना अटक करण्यात झालीये.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!