Share

‘तेव्हा ‘दीदी ओ दीदी’ केले, आता लोक ‘दादा गप्प बस दादा’ म्हणणार आहेत!’

Published On: 

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने कोणतीही कारवाई केली तरी आम्ही १ जुनपासून औरंगाबादेतील दुकाने उघडणारचे, असा थेट इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रशासन मोठ्या व्यापाऱ्यांवर मेहेरबानी करत आहे, तर छोट्या व्यापाऱ्यांना मात्र दंड ठोठावत आहे. शासनाने छोट्या दुकानांचे सील उघडले नाही तर गरीब छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने मी स्वत: उघडायला येईल’, असा इशारा जलील यांनी दिला.

यासोबतच, जलिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावूक झालेल्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली. ‘पंतप्रधानांचं तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. या देशात त्यांचे भक्तही ऐकणार नाही. कारण, जेव्हा देशात लाखोंच्या संख्येने लोक रडत होते तर आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जाऊन ‘दीदी ओ दीदी’ असं करत होते. आता लोक त्यांना ‘दादा गप्प बस दादा’.. म्हणणार आहेत.

आता ती वेळ आली असून स्वत: पंतप्रधानांनी ती आणली आहे. आता टीव्हीवर येऊन रडण्याचं काही कारण नाही. आम्हाला माहिती आहे कोण कसा अभिनय करतं. लोकांना सांभाळण्याची वेळ होती तेव्हा जाऊन प्रचार करत होतात, लाखोंच्या संख्येने गर्दी गोळा करत होतात आणि आता ज्ञान पाजळत आहात,’ अशा शब्दात जलिल यांनी मोदींवर टीका केलीय.

मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे फक्त टीव्हीवर येतात आणि ज्ञान देतात. त्यांना राज्याच्या हिताचा काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे, पण आम्ही १ जूननंतर दुकानं उघडणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दुकानदारांचे हप्ते आणि व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात यावं. नाहीतर आम्ही लॉकडाऊन असला तरी तो झुगारून दुकानं उघडू अशा थेट इशारा यावेळी इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!