Share

kali movie poster controversy | ‘काली’ च्या निर्मात्या लीना यांना जीवे मारण्याच्या धमक्या; सोशल मीडियावर शेयर केले स्क्रीनशॉट्स

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क: काली या माहितीपटाच्या पोस्टरवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. त्यातच आता चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई आणि त्यांच्या टीममधील इतर १० जणांविरुद्ध धार्मिक भावना भडकावल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तर याच दरम्यान, लीना यांना जीवे मारण्याच्या तसेच बलात्काराच्या धमक्यांचे संदेश येत आहेत. ज्याचे स्क्रीनशॉट त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

लीना यांनी ट्विट केले आहे की, “देवीच्या वेशात आलेल्या अभिनेत्याने चित्रपटासाठी धूम्रपान करणे हा गुन्हा नाही. भाजपचे भाडोत्री जे काही करत आहेत तो संघटित गुन्हा (organized crime) आहे. मी एका सार्वभौम देशात राहते आणि इथे कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यांना कला काय असते हे माहीत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला दररोज 2,00,000 हून अधिक सोशल मीडिया अकाउंटवरून धमक्या येत आहेत. तसेच मला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला तामिळनाडू सरकारने अटक केली आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या की, माझा तामिळनाडूशी जवळचा संबंध आहे. तामिळनाडूमध्ये कालीमाता ही वेगळ्या प्रकारची देवी म्हणून मानली जाते. शेळीच्या रक्तात शिजवलेले मांस ती खाते, विडी ओढते आणि विशिष्ट प्रकारचे नृत्य करते. ही तीच काली आहे जिचं रूप मी चित्रपटामध्ये धारण केलं आहे.”

लीना यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी एक कलाकार आहे. द्वेष करणाऱ्या गुलामापेक्षा माझ्याकडे अधिक सामर्थ्य आहे. मला माहित आहे की माझ्या कलेची ताकद कट्टरतेने भरलेल्या भाडोत्री लोकांपेक्षा जास्त आहे. आता माझ्यासोबत जे केले जात आहे तो गुन्हा आहे. पण मी जे केले आहे ती माझी कला आहे.

हिंदू महिलेला अटक

लीना यांना धमकावल्याप्रकरणी कोईम्बतूरमध्ये एका हिंदू महिला कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. या महिलेने लीना यांना धमकावणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर या महिलेवर कारवाई करत पोलिसांनी तिला अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!