बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक झाली असल्याची घटना काल घडली. बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील टेकुलगुडम- तर्रेम जंगल परिसरात ही चकमक सुरू आहे. दुर्दैवाने या चकमकीत आतापर्यंत २२ जवान शहीद झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. तर ३ नक्षली मारले गेले आहेत. बिजापूर एसपीनी चकमक सुरू असल्याची कबुली काळ दिलेली होती.
काल त्या ठिकाणी तब्बल तीन तास जोरदार धुमश्चक्री सुरु होती. यावेळी 21 जवान गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र, आता २१ पैकी १४ जवान मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सात जवानांचा शोध अजूनही सुरु आहे. काल या चकमकीत ८ जवान शहीद झाले होते. तर २४ जवान जखमी झाले होते. यापैकी ७ जवानांची प्रकृती गंभीर आहे.
22 security personnel have lost their lives in the Naxal attack at Sukma-Bijapur in Chhattisgarh, says SP Bijapur, Kamalochan Kashyap
Visuals from the Sukma-Bijapur Naxal attack site pic.twitter.com/C3VvAdvjaN
— ANI (@ANI) April 4, 2021
बीजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षविरोधी अभियानामध्ये एसटीएफ, डीआरबी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाचे ४०० जवान सहभागी झाले होते. शोध अभियानादरम्यान नारायणपूर येथे जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजूने यावेळी तुफान गोळीबार झाला होता अशी माहिती सध्या मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कधीतरी खरं बोला रे नाही तर लोकं तुमच्यावर शेण फेकून मारतील, निलेश राणेंचा मलिकांना टोला
- नांदेड जिल्हा; कोरोना रुग्णांना लूटणाऱ्या खासगी लॅबला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
- ‘मास्क वापरला तर ब्युटी पार्लर कसे चालणार ?’ आसामच्या आरोग्य मंत्र्यांच अजब विधान
- सीएसकेसाठी धोनी जोरदार पुनरागमन करेल का? यावेळी आव्हान मोठे
- मे अखेरपर्यंत देशभरात कोरोनाचा हाहाकार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं सांगितलं ‘इतकी’ असेल रुग्णसंख्या

