🕒 1 min read
नागपूर- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारची चिंताही वाढली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. यात रुग्णांना ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत असल्यानं आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग असताना काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका करत घरचा आहेर दिला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.
Wrote a letter to The Hon'ble Prime Minister for Proclamation of Health as well as Financial Emergency looking to pandemic arisen out of COVID-19 disease in State of Maharashtra as per Article 360 of Constitution of India at least for two months.#PMOIndia #COVID19 @PMOIndia pic.twitter.com/0ULCzEGW7p
— Dr. Ashishrao R. Deshmukh Office (@AshishRDoffice) April 20, 2021
आशीष देशमुख म्हणतात की, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान दोन महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे, असे आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ना पालखी ना सोहळा; लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राम जन्मोत्सव होणार घरातच
- पोलार्डमुळे रोहित शर्माला बसला १२ लाख रुपयांचा दंड
- पराभवानंतर गुणतालीकेत स्थान न गमावता मुंबई इंडियन्सला बसला ‘असाही’ फटका
- मुंबई इंडियन्सला पुन्हा भोवले फलंदाजाचे अपयश; दिल्लीपुढे ठेवले माफक आव्हान
- सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित मैदानात नसल्याचे खरे कारण आले समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
