Share

‘क्रिकेटर म्हणून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे’

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे एकदिवशीय आणि टी २० चे कर्णधारपद सोपवले आहे. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माकडे टी-20 संघाचे कर्णधारपद दिल्यानंतर आता त्याला वनडे संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो एकदिवसीय सामन्यात संघाचा कर्णधार असेल. कर्णधार झाल्यानंतर रोहितने बीसीसीआय (BCCI) टीव्हीला मुलाखत दिली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रोहितचा हा व्हिदिओ शेअर केला आहे.

1 मिनिट 24 सेकंदाच्या या मुलाखतीत रोहित शर्मा म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही भारतासाठी क्रिकेट खेळत असता तेव्हा तुमच्यावर खूप दबाव असतो. बरेच लोक सकारात्मक आणि नकारात्मक बोलतात. पण क्रिकेटपटू म्हणून माझे काम खेळावर लक्ष केंद्रित करणे आहे कारण लोक काय बोलतात यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा स्थितीत सामना जिंकता यावा म्हणून संपूर्ण संघ इकडे-तिकडे गोष्टी सोडून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करतो.

लोक काय म्हणतील हे या संघाला चांगलेच माहीत आहे. जेव्हाही आम्ही हाय प्रोफाईल सामना खेळतो तेव्हा आमचे लक्ष आमच्या खेळावर असते. खेळादरम्यान आपण आपल्या हातात जे आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही खेळाडूंसोबत घट्ट नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हे आम्हाला आमचे ध्येय साध्य करण्यात खूप मदत करते. राहुल भाई (मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड) देखील यात आम्हाला मदत करतात. असं रोहित शर्मा म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!