मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला उतरती कळा लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. खडसे यांच्यापाठोपाठ आणखी काही छोट्या-मोठ्या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला. दरम्यान,आता पुन्हा एकदा आघाडीच्या नेत्यांकडून काही नेते भाजप सोडून आमच्या पक्षात येणार असल्याचा दावा करणे सुरु केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी येत्या चार महिन्यात राष्ट्रवादीत इंकमिंग सुरू होईल. जे पक्ष सोडून गेले होते ते आता पक्षात येण्यास इच्छुक आहेत असा दावा मलिक यांनी केला.
तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने देखील काहीसा असाच दावा केला आहे. भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाला लागलेली गळती पाहून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, भाजपातून कोणीही जाणार नाही असा खोटा दावा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागत आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, काल शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत आहे. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत;केंद्रीय कृषिमंत्र्यांचा पुनरुच्चार
- नवा कोरोना विषाणू जास्त वेगानं फैलावत असला तरी तो जास्त घातक नाही ?
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल : अस्लम शेख
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात


