भिवंडी : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर राष्ट्रवादीमध्ये मेगा भरती सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजप नेते व माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरली. तर, काही दिवसांपूर्वीच हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
या प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेते, पदाधिकारी यांची देखील राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीने स्वतःचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसलाच खिंडार पाडलं आहे. तब्बल १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, आदी दिग्गज नेत्यांच्या उपस्थित हा प्रवेश पार पडला आहे.
हे सर्व नगरसेवक भिवंडीतील आहेत. भिवंडीतील काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत, अशी माहिती सद्या मिळत आहे. दरम्यान, यामुळे काँग्रेसची नाराजी वाढू शकते. राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने याआधीच दुय्यम वागणूक, निर्णय प्रक्रियेत सहभागी न करणे, पुरेसा निधी उपलब्ध न करून देणे अशा कारणांमुळे जाहीर नाराजी व्यक्त केली होती. देशभरात उतरती कळा लागलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली असली तरी काँग्रेसमधील आऊटगोईंग रोखण्याचं मोठं आव्हान नेत्यांसमोर आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ती ताकद आता शिवसेनेत राहिलेली नाही, कारण ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत’
- शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मध्य प्रदेशात जोरदार स्वागत
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- ‘हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात?’
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

