रत्नागिरी : काल शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. यावर देखील त्यांनी प्रत्युत्तर देताना लवकरच शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील असं भाकीत वर्तवलं आहे.
देशातील कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे अशी कोपरखळी त्यांनी मारली. एवढंच नाही तर, आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी खिल्ली उडवली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं लावेल हा माणूस’ अशी जहरी टीका राणेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं लावेल हा माणूस.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 23, 2020
तर, ‘शिवसेनेकडे सध्या 56 आमदार असल्यामुळे उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, 25 अजून असते तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते…’ असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ती ताकद आता शिवसेनेत राहिलेली नाही, कारण ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत’
- शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मध्य प्रदेशात जोरदार स्वागत
- महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपामधून नेते मंडळी फुटण्याची आस
- ‘हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात?’
- दोस्तीत कुस्ती : राष्ट्रवादीने पाडलं काँग्रेसलाच खिंडार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

