Share

काँग्रेसकडून प्रियांकांची ‘इमेज बिल्डिंग’; तब्बल १० लाख कॅलेंडरचे वाटप !

Published On: 

लखनऊ : नवीन वर्षाचे औचित्य साधूत उत्तर प्रदेश मधील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून हे कॅलेंडर जाहीर करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांचा उत्तर प्रदेशातील जनसंपर्क, त्यांनी केलेले आंदोलन आदींचे फोटो या कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर छापण्यात आले आहेत. त्यातून प्रियांका गांधी यांचा संघर्ष जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅलेंडरच्या माध्यमातून पुन्हा एकदा घराघरात पक्ष पोहोचवण्याचं काम काँग्रेसकडून केलं जात आहे. हे कॅलेंडर १२ पानी आहे. प्रत्येक गाव, शहर आणि वॉर्डापर्यंत हे कॅलेंडर पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी सज्ज केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार या कॅलेंडरचं वाटप केले जात आहे.उत्तर प्रदेश मध्ये तब्बल १० लाख कॅलेंडर पाठवण्यात आले आहेत.

यापूर्वी वायनाड येथील कॉंग्रेस कार्यालयातून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फोटोचं कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आलं होतं. आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्याही फोटोचं कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या कॅलेंडरमधून प्रियांका गांधी यांच्या कामाचा आढावा घेतला आहे. जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी केलेला संघर्ष साकारण्यात आला आहे. या कॅलेंडरचं उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात वाटप करण्यात येणार आहे. यावरून कॉंग्रेसकडून प्रियांका गांधी यांची इमेज बिल्डिंग करण्यात येत असल्याचं दिसत आहे.

अमेठी, रायबरेली, हरियाणा आणि झारखंडमधील प्रियांका यांच्या जनसंपर्काचे फोटो या कॅलेंडरमध्ये छापण्यात आले आहेत. प्रियांका गांधी यांनी उभ्भा येथील हत्याकांडानंतर आदिवासी महिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले होते. त्यावेळेचे फोटो देखील या कॅलेंडर मध्ये आहेत. हाथरस पीडितेच्या घरी जाऊन पिडीत कुटुंबाचं सांत्वन करतानाचे फोटो, हाथरसकडे जाताना पोलिसांकडून लाठीचार्ज होत असताना त्याला विरोध करतानाचे फोटो, सीएए-एनआरसीच्या विरोधात रस्त्यावर उतरून केलेल्या घोषणाबाजीच्या फोटोचाही कॅलेंडरमध्ये समावेश आहे. या माध्यमातून प्रियांका गांधींच्या इमेज बिल्डिंगच काम काँग्रेस कडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!