पुणे : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.
राज्याने अनलॉक प्रक्रियेच्या अंतर्गत मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली होती. मात्र कोरोना विषाणू पुन्हा फोफावत असल्याचं लक्षात घेवून राज्यसरकारने योग्य ते कठोर नियम लागू करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर संकष्टी चतुर्थीदिनी ३१ मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
यापूर्वी मार्चमध्येच अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं .संकष्टी चतुर्थीला शहर आणि परिसरातून हजारो नागरिक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. कोरोना प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून बुधवारी मंदिर बंद राहणार आहे.
दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने भाविकांनी बाप्पांचं ऑनलाइन दर्शन घ्यावं, असे आवाहन केलं जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांना चतुर्थीच्या दिवशी www.dagdushethganpati.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गेट २०२१ चा निकाल जाहीर; आयआयटी मुंबईने स्कोअरकार्ड केले जाहीर
- लॉकडाऊनबाबत ‘या’ तारखेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात; राजेश टोपेंचा इशारा
- भांडुप ड्रीम्स मॉल आगीतील नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित भरपाई द्यावी – आठवले
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक


