Share

गेट २०२१ चा निकाल जाहीर; आयआयटी मुंबईने स्कोअरकार्ड केले जाहीर

Published On: 

मुंबई : गेट 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने आज स्कोअरकार्ड जाहीर केले. उमेदवार आपले स्कोरकार्ड अधिकृत संकेतस्थळ gate.iitb.ac.in वर डाउनलोड करू शकतात.

उमेदवार केवळ गेट स्कोरकार्ड वापरू शकतात जे जारी होण्याच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी वैध असते. 30 जूनपर्यंत गेट स्कोअर कार्ड वेबसाईटवर उपलब्ध असेल. मात्र त्यानंतर, जुलै ते डिसेंबर या कालावधीत ते डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये फी भरावी लागेल.

gate.iitb.ac.in या अधिकृत वेबसाइटद्वारे निकाल तपासता येतो. मुख्यपृष्ठावर, ‘गेट 2021 निकाल’ या लिंक वर क्लिक करा. आता नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द वापरून लॉगिन करा. निकाल स्क्रीनवर उघडेल. भविष्यातील संदर्भासाठी ते डाउनलोड करा आणि आपल्याकडे ठेवा.

यावर्षी एकूण 7,11,542 उमेदवारांनी गेट 2021 ची परीक्षा दिली. यापैकी, एकूण 1,26,813 उमेदवार म्हणजेच सुमारे 17.82% उमेदवार पात्र ठरले. उत्तीर्ण होणा-या एकूण उमेदवारांपैकी 98732 पुरुष आणि 28081 महिला उमेदवार आहेत.

कोरोना विषाणू साथीच्या रोगामुळे सुरक्षा व्यवस्थेची दखल घेऊन ५ आणि १२ फेब्रुवारी या अतिरिक्त दिवशी ही परीक्षा घेण्यात आली. 6, 7, 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!