मुंबई : महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. अशातच काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ८ महत्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांची माहिती देणारे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले होते.
यापैकी मंत्री अमित देशमुख यांच्या वैद्यकीय खात्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती देणाऱ्या ट्विटमध्ये ‘संभाजीनगर’ आणि कंसात औरंगाबाद असा उल्लेख केल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीनगर संदर्भात भूमिका ठाम असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. शिवसेनेच्या काही नेत्यांनी याचं स्वागत देखील केलं.
यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे नाराजी उघड केली होती. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र वेगळीच शंका येत असल्याचं समोर येत आहे. ‘राज्यात अनेक निर्णय हे प्रशासकीय पातळीवर अधिकारी जाणीवपूर्वक घेत आहेत का? याबाबत चौकशी सुरू केली आहे. काही निर्णय मंत्र्यांना कळवले जातात का? याबाबत तपासणी सुरू आहे’ असं ते म्हणाले आहेत.
‘ड्रेस कोड चा निर्णय कसा समोर आला याबाबत सर्व अनभिज्ञ होतो, असे निर्णय होताना तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घ्यावा असे ठरवलं. संभाजीनगरच्या बाबतीत, असं काही झालं का? हे तपासून पाहत आहे. कोणी जाणीवपूर्वक केलं का हे तपासणार असल्याची’ माहिती देखील त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- खासदार रवी किशन हे संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर
- एकटा जीव सदाशिव.. मोठ्या शहरांमध्ये विवाहितांपेक्षा अविवाहित नागरिक अधिक आनंदी !
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- हिंसाचारानंतर ‘बराक ओबामांच’ ट्रम्प समर्थकांना आवाहन तर ट्रम्पवर निशाणा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
