Share

फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !

Published On: 

दिग्विजय दीक्षित, पुणे : क्रिकेटप्रेमींसाठी एखाद्या भयपटाची कथा वाटावी असा तो दिवस होता १९ डिसेंबर २०२०. ज्या दिवशी ३६-९ अशी नीचांकी धावसंख्या टीव्हीच्या स्क्रीनवर दिसली, भारतीय संघातील सर्व महारथी म्हणवले जाणारे खेळाडू की ज्यांच्यापैकी एकही खेळाडू दोनअंकी धावसंख्या सुद्धा गाठू शकला नव्हता. अगदी या शतकातील सर्वात नीचांकी धावसंख्या एवढ्या खालच्या पातळीवर असण्याची ती वेळ होती. अशातच भारताचा स्टार फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे भारतात परतला. मालिकेतील तब्बल ३ कसोटी सामने शिल्लक असताना अक्षरशः क्रिकेट तज्ज्ञांनी ‘यापुढे भारतीय संघाचा परतीचा प्रवास प्रचंड अवघड आहे आणि कदाचित भारतीय संघ यापुढे ही मालिका ४-० ने ही हरू शकतो’ अशा प्रकारच्या भविष्यवाणी करायला सुरुवात झाली होती.

अशा विचित्र वातावरणात दुसऱ्या कसोटीला सुरवात झाली ती ‘अजिंक्य रहाणे’ च्या नेतृत्वात. त्यातच नाणेफेक हरल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी विराट कोहली, मोहम्मद शमी, इशांत शर्मा यांच्या अनुपस्थितीत आणि शुभमन गिल, मोहम्मद सिराज यांच्या सारख्या नवख्या खेळाडूंना घेऊन तो स्वभावाने शांत आणि संयमी कर्णधार मैदानात उतरला. कसोटी सामना जिंकण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गोलंदाजांची कामगिरी जी पहिल्याच डावात भारतीय गोलंदाजांनी दाखवून दिली आणि केवळ १९१ धावात ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केले. इथेच भारतीय संघाने मागील कसोटी पराभवाच्या छायेतून बाहेर पडल्याची पहिली चुणूक दाखवली.

भारतीय संघाने पहिल्या डावात जेव्हा फलंदाजी सुरू केली तेव्हा पुजाराच्या विकेटनंतर ६४-३ अशी अवस्था झाली तेव्हा पुन्हा भारतीय संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करतो आहे की काय अशी भावना मनात निर्माण होऊ लागली होती. त्यानंतर मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने विहारी, पंत आणि जडेजा साथीत डावाला हळूहळू आकार देत भारतीय संघाला एका भक्कम स्थितीत आणून ठेवले. रहाणेचे शतक आणि जडेजाच्या अर्धशतकाच्या कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने १३१ धावांची भक्कम आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही त्यांचे फलंदाज फारशी समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत आणि भारतीय गोलंदाजांनी आपल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर सर्वबाद २०० वर ऑस्ट्रेलियाला रोखले. शेवटच्या डावात पुन्हा रहाणे आणि गिल यांच्या जोडीने ७० धावांचे नाममात्र आव्हान सहज पार केले.

या सर्व खेळात भारतीय संघाने ‘फिनिक्स पक्षाची’ आठवण नक्कीच करून दिली. पहिल्या कसोटीनंतर अक्षरशः गलितगात्र अवस्थेतून भरारी घेत दुसरी कसोटी भरभक्कम पद्धतीने जिंकत, पुढील वर्षात (२०२१) मध्ये होणाऱ्या २ कसोटी सामान्यांसाठी रंगत आणली आहे. आता मालिकेत राहिलेले हे २ सामने भारतीय संघ कशा पद्धधतीने खेळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!