Share

एमबीबीएसच्या परीक्षांबाबत अमित देशमुखांची महत्वाची माहिती

Published On: 

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्या माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, पुढे ढकललेल्या या परीक्षा कधी होणार ? याबाबत अमित देशमुख यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या ज्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.एमडीची परीक्षा आम्ही घेतली आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी त्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या असेही देशमुख म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!