🕒 1 min read
नांदेड : पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून फेलोशिपपासून वंचीच ठेवण्यात आले आहे. याच कारण म्हणजे राज्यातील एमफील तसेच पीएचडी विद्यार्थ्यांचे फेलोशिपचे अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र ( बार्टी) कडून अर्ज मागण्यावलेले नाहीत. त्यामुळे सर्व संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचीत राहिले आहेत.
महाराष्ट्रामधील अनुसुचीत जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. मागच्या वर्षी मार्च २०२० पासून सुरु असलेला लॉकडाऊन, कोराेना आणि संचारबंदीचा फटका बसल्याने अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. तेव्हापासून अनेकांचा रोजगार देखील बुडाला आहे. तर अश्या परिस्थितीमध्ये रोजगार कसा मिळणार हा प्रश्न उभा राहिला आहे. या परिस्थितीत कसे जगायचे असा प्रश्न संशोधक विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. बार्टीकडून मिळणारी फेलोशिप २ वर्षांपासून अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.बार्टीच्या वतीने २०१९ – २०२० तसेच २०२० – २०२१ या दोन्ही वर्षाचे अर्ज अद्यापही मागवले नाही.
तर दुसरीकडे शाहू महाराज संशोधन तसेच प्रशिक्षण केंद्र साथीने एमफील तसेच पीएचडी च्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप जाहीर केली आहे. परंतू बार्टीने मात्र अनुसुचित जातीच्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या बाबत नॅशनल एससी, एसटी, ओाबीसी स्टूडंट अॅण्ड यूथ फ्रंटच्या राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देवून बार्टीकडून राज्यातील सर्व एमफील, पीएचडी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज मागवण्यात यावेत, आणी राज्यातील १०० संशोधकांना पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप सुरु करण्याची मागणी देखील या वेळी केली आहे.या मागणीचा मुख्यमंत्री यांनी विचार केला नाही, तर आम्ही आंदोलन करणार असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात देखील म्हटले आहे. या वेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी नेते देखील उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राने घोषणा केली ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अन् दिले २६ हजारच; मंत्री शिंगणेंची माहिती
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
