Share

संतापजनक : नखांसाठी शिकाऱ्यांनी गरोदर वाघिणीला जाळलं

Published On: 

यवतमाळ : जगभरात वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी कडक कायद्यांची तरतूद करण्यात आली आहे. तर, शिकाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. भारतात देखील गेल्या काही दशकांमध्ये वन्य जीवांची संख्या वारंवार घटत असल्याने विविध योजना राबवण्यात येत आहे. मात्र, तस्कर पैशांसाठी वन्यप्राण्यांची क्रूरपणे हशिकार करत असल्याच्या घटना वाढत आहेत.

आता यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली आहे. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

संतापजनक म्हणजे ही वाघीण गरोदर असल्याचं समजत आहे. गर्भवती वाघिणीच्या पोटात चार बछडे होते. पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र . ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. याठिकाणी नाल्याला लागूनच एक छोटी गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती.

या गुहेत वाघिणीचा वावर असल्याचं स्थानिक शिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी या गुहेतुन बाहेर येणाऱ्या वाटेत बांबू व इतर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. ती वाघीण मेली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या. ती मेल्याची खात्री केल्यानंतर तिचे दोन्ही पंजे कापून नेले.

वनरक्षकाने ही माहिती वरिष्ठांना दिली. यावेळी विभागीय वनाधिकारी (वन्यजीव)सुभाष पुराणिक, मुकु टबन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव प्रकाश महाजन, मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विरानी, घटनास्थळी पोहोचले. सुमारे चार वर्षीय वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकलेला दिसून आला. परिसरात बांबूच्या काड्या, क्लच वायर आणि जाळल्याच्या खुणा आढळून आल्या असून आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, वनरक्षकांनी देखील या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!