मुंबई : राज्यात कोरोनाने (Corona) हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा राज्यात कोरोनाची लस मोफत दिली जाणार अशीच घोषणाच करून टाकली होती. पण, काही वेळांनी त्यांनी हे ट्वीट डिलीट केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाबाबतचं ट्विट डिलीट केल्याच्या कृतीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, वाटाघाटी आणि टक्केवारीमुळे लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये , हीच अपेक्षा असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
#बिघाडी_सरकारचे लाडके मंत्री @AUThackeray यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. #हिंदू_हृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘ वाटाघाटी ʼ आणि ‘टक्केवारीमुळे ʼ लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत #लसीकरणाचा’ . pic.twitter.com/gBLC8F33br
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) April 25, 2021
काय होतं ‘ते’ ट्विट
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
- झाकीर हुसेन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत दिला धीर
- नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोनाची दांडी ? ज्ञान पाजळणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई होणार का ?
- ज्याच्यासाठी कमावलं तोच कोरोनाने हिरावला; वृद्ध दाम्पत्य FD मोडून करतंय कोरोना रुग्णांना मदत
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

