Share

“राज्यपाल राजकारण करत आहेत”- संजय राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यपालांना महाविकास आघाडीतील नेते वारंवार भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची विनंती करत आहेत. तरीही ‘राज्यपाल ते पद भरत नाहीत याचा अर्थ राज्यपाल राजकारण करत आहेत’. अशी सडेतोड टीका मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज्यपालांवर केली आहे.

तसेच संजय राऊत म्हणतात, राज्यपाल ते पद भरत नाहीत याचा अर्थ राज्यपाल ज्या पक्षातून आले आहेत, त्या पक्षाच्या दबावामुळे ते राजकारण करत आहे. राज्यपाल विरुद्ध सरकार अशा प्रकारचा संघर्ष अनेक राज्यात झालेला आहे आणि सुरू आहे. पण महाराष्ट्रात ज्या पातळीवर राज्यपालांनी आणि त्या पक्षाने हा संघर्ष नेऊन ठेवला त्याची इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल.

आणि राज्यपालांनी ज्या वारंवार भूमिका घेतल्या, त्या कायद्याच्या आणि घटनेचा भंग करणाऱ्या आहेत. अशा घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं, पदावर राहू देणं आणि त्यांच्या माध्यमातून बहुमतातील सरकारला अडचणी करू देणं हे आयोग्य आहे. असे मीडियाशी बोलत असताना संजय राऊत आक्रमक झाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!