Share

मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज ; ‘हा’ फलंदाज इंग्लंडला पराभूत करण्यासाठी उत्सुक

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाचे या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य असेल. पहिल्या सामन्याच्या खेळपट्टीवर नक्की काय केले पाहिजे हे आम्हाला कळले नाही, अशी कबुली सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. परंतु, या मालिकेचे सर्वच सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार असल्याने भारताला या खेळपट्टीवर कसा खेळ करायचा याचा लवकरच शोध लावावा लागणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाकडून अनेक युवा फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. त्यापैकी एक म्हणजेच इशान किशन. इशान किशनवर निवड समितीने विश्वास दाखवून संधी दिली. यासाठी त्याने समितीचे आभार मानले आहेत. तसेच मी या मालिकेत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज असल्याचं इशान म्हणाला.

“माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिलीत. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. माझी निवड झाली. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत”, अशी प्रतिक्रिया इशानने दिली. त्याने Wisden या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळेस तो बोलत होता.

इशान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून  खेळतो. “ड्रेसिंग रुममध्ये अनेक खेळाडू असतात. त्यांचा सहवास लाभतो. त्यामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकायलं मिळतं. आपण त्याच्यांसारखं खेळायचा प्रयत्न करतो. मला रोहित शर्माकडून खूप काही शिकायला मिळालं.

“मी इंग्लंड विरुद्धच्या या टी 20 सीरिजमध्ये टीम ज्या नंबरवर खेळवेल त्या नंबरवर खेळण्यासाठी तयार आहे. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत टॉप ऑर्डर ते मिडल ऑर्डरमध्ये प्रत्येक क्रमांकावर खेळलो आहे. यामुळे तुम्हाला निर्णायक क्षणी कशी कामगिरी करायची, याचा अनुभव मिळतो. त्यामुळे मी कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो”, असं इशानने स्पष्ट केलं. इशान देशांतर्गत स्पर्धेत झारखंडचे नेतृत्व करतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!