औरंगाबाद : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही निर्बंध घालून दिले आहे. परंतु स्थानिक प्रशासनाच्या अनुषंगाने वाळूज एमआयडीसी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यासर्व अवैध धंद्यांवर प्रशासनानेच वरदहस्त ठेवला असल्याची चर्चा परिसरात आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला येण्यापासून रोखण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना जिल्हा प्रशासनासह, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, मनपा, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क आदीसह सर्वच विभाग आपापल्या परीने मदत करत आहे. परंतु सर्वच प्रशासनातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे जिल्हा प्रशासनाने केलेले नियम पायदळी तुडवले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता सामान्य नागरीकडून वर्तवली जात आहे.
संध्याकाळी ४ वाजेच्या नंतर व विकेंडला सर्वच वाईन शॉप आणि बार बंद करण्याचे आदेश आहे. परंतु वाळूज एमआयडीसी परिसरात संध्याकाळी ४ वाजेच्या नंतर बहुसंख्य बार, हॉटेल सर्रास पने सुरु आहे. तर वाईन शॉप समोरच रात्री १२ वाजेपर्यंत चढ्या भावाने दारू विक्री सुरु आहे. या ठिकाणी नागरिकांना थांबवून दारू विक्री केली जाते आहे.
काही दिवसापूर्वी गुन्हे शाखेने अवैध दारू विक्रीवर छापा टाकून अनेकांवर कारवाई केली होती, परंतु कारवाई नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होण्यास वेळ लागला नाही. तर या अवैध दारू विक्रीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देखील अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना होत असलेला अवैध दारू विक्रेत्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरीकातून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सांगली, कोल्हापूरमधील परिस्थिती बिकट ; मदतकार्यासाठी जाणार’ ; खासदार संभाजीराजे
- मिलरच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची आर्यलँडवर ४२ धावांनी मात
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- बचावकार्याचा वेग वाढवून राज्य सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी – आठवले
- दुसऱ्या टी-२० सामन्यात झिंबाब्वेचा बांग्लादेशवर धक्कादायक २३ धावांनी विजय


