Share

जर पुन्हा लॉकडाऊन करायचा असेल तर…; पडळकरांनी दिला सरकारला इशारा

Published On: 

पंढरपूर : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

शासनाने लागू केलेले कडक निर्बंध नागरिक पाळत नसल्याने मुख्यमंत्र्याने ही भूमिका घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसध्याची परिस्थिती पाहता राज्याला १५ दिवस लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगितले आहे.

लॉकडाऊन केल्याने निश्तिच कोरोनाला लगाम लागेल पण यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांना देखील अनेक संकटाना सामोरे जावे लागते. हीच परिस्थिती लक्षात घेवून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी द्राक्ष शेती करणाऱ्यांची भूमिका सरकार समोर मांडली आहे.

‘लॉकडाऊन पूर्वी द्राक्षेला सरासरी ५० रु. किलो जागेवर दर होता. परंतु लॉकडाऊन मध्ये १० ते १५ रु. किलो प्रमाणे द्राक्षे विकली गेल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातच राज्य सरकारने लाईट बिलासाठी विद्युत पंपाची लाईट बंद करुन त्रास दिला आहे.

द्राक्ष बागेला दोन दिवस पाणी नाही दिले तर माल लूज पडतो त्यानंतर कोणताही व्यापारी ती द्राक्षे विकत घेत नाही. पुन्हा या वर्षी जर राज्य सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर अगोदर द्राक्ष शेतीचे कृषी विभागामार्फत पंचनामे करुन त्यांना हमीभाव द्यावा व लॉकडाऊन मुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.’ अशी मागणी पडळकर यांनी सरकारकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!