Share

ऑफिसांमध्ये 100% उपस्थिती लावायची असेल, तर कर्मचारी लोकलविना पोचणार कसे?

Published On: 

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. २०२० देशात शिरकाव केलेल्या रोगाने अक्षरशः थैमान घातले. दुसऱ्या लाटेत या रोगाची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. यामुळे आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली. तर, कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढण्यासोबतच मृत्यूचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे अनेक कुटुबांचा आधार गेला असून देशाची आर्थिक स्थिती देखील बिकट होत आहे.

देशात मुख्यतः महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसून आले. यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावण्यात आले. तर, सध्या निर्बंधांना शिथिलता देण्यात आली असून आणखी सूट मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. सर्वांत आवश्यक लोकलप्रवासाला परवानगी न देता ठाकरे सरकारने कठोरतेचा कळस गाठला आहे. ऑफिसांमध्ये 100% उपस्थिती लावायची असेल, तर कर्मचारी लोकलविना पोचणार कसे? हे सरकार आता चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतेय अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान,मनसेने देखील या सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो, गर्दी ही असते.आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण ‘शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण होणार नाही’.मला खात्री आहे आपण हे करू शकता, आमचा सीएम जगात भारी. अशा आशयाचे ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!