Share

मोठी बातमी : महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी, नारायण राणेंचे अमित शहांना पत्र !

Published On: 

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता याप्रकरणात पुढील सुनावणी १९ तारखेला होणार आहे. तर दुसरीकडं, एनआयए सचिन वाझे यांची कसून चौकशी करत होती. यामुळे सचिन वाझे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी ११ वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, असं भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितलं आहे. अमित शहा यांना दिल्लीत असतानाच तीन दिवसांपूर्वी पत्र लिहून ही मागणी केल्याचंही राणे यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ‘मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाजे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी यांच्याकडून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ कि शिवसेना या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी’. अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!