Share

पंचनामे करतांना हयगय दिसल्यास थेट संपर्क करा- आमदार कैलास पाटलांचे आवाहन

Published On: 

उस्मानाबाद : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाकरे सरकार ठामपणे उभे आहे आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आहे. त्यांनी कळंब तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी केली.

जिल्ह्यातील बहुला, आढाळा, आथर्डी, सात्रा, खोंदला, भाटसांगवी, भोगजी, अडसुळवाडी, देवळाली या भागातील शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. जिल्ह्यातील सोयाबीन व इतर पिकांच्या नुकसानीच्या पिक विमा कंपनीस ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले. मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पीक विमा कंपनीच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता वैयक्तिक पंचनामे होणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरला अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे नुकसान झालेल्या पिकांची माहिती ७२ तासांच्या आत कळविण्याचे अवाहनही आमदार पाटील यांनी केले.

पिक विमा बाबतीत काही अडचण आल्यास संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, विमा कंपनीच्या तालुकास्तरावरील विमा प्रतिनिधी किंवा तालुका व्यवस्थापक (मॅनेजर) यांच्याशी संपर्क साधून नुकसानीच्या तक्रारी ऑफलाईन दाखल करून पोहोच घ्याव्यात. या प्रक्रियेत कोणी हयगय करत असेल किंवा दुर्लक्ष करत असल्यास त्याबाबत तातडीने आपल्याशी संपर्क साधा, असेही आवाहन आमदार घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!